✉ info@amhisatarkarudyojaksangh.in
सहभागी व्हा

आम्ही सातारकर
उद्योजक संघ

सातारकरांसाठी व्यवसाय, रोजगार आणि संधींचे विश्वासार्ह व्यासपीठ

सातारा जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर स्थलांतरित होऊनही साता-याशी नाळ असलेले ‘साताऱकर’ उद्योजक, व्यावसायिक, नवउद्योजक व नोकरदारांना संघटित करणारे व्यासपीठ.

👉 व्यवसाय वृद्धी 👉 नवीन संधी 👉 सांघिक प्रगती
आमची मूल्ये

विश्वास, प्रगती आणि मार्गदर्शन

परस्पर विश्वास, सहकार्य आणि एकत्र येऊन पुढे जाण्याच्या भावनेवर आमचा समुदाय उभा आहे.
🤝

विश्वास आणि एकत्रितपणा

आमचा समुदाय परस्पर विश्वास, सहकार्य आणि एकत्र येऊन पुढे जाण्याच्या भावनेवर उभा आहे. प्रत्येक सदस्याला समान संधी आणि आदर दिला जातो.

📈

प्रगती आणि उद्योजकता

व्यवसाय वाढ, नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे हे आमचे मुख्य मूल्य आहे.

💡

मार्गदर्शन आणि ज्ञानवाटप

अनुभव, ज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाची देवाणघेवाण करून प्रत्येक सदस्याच्या वैयक्तिक व व्यावसायिक प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आमच्याबद्दल

आम्ही सातारकर उद्योजक संघ

आम्ही सातारकर उद्योजक संघ ही एक सामाजिक व व्यावसायिक संघटना आहे, जी मुंबई व परिसरात राहणाऱ्या तसेच सातारा जिल्ह्याशी नाळ जुळलेल्या उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार आणि नवउद्योजकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे.


सातारा जिल्ह्यातील तरुण, महिला व अनुभवी व्यावसायिक यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, व्यवसाय वाढीसाठी नेटवर्किंग, तसेच नोकरीच्या संधी शोधण्यासाठी मदत करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.


आमच्या संघटनेच्या माध्यमातून विविध उद्योजक मेळावे, व्यवसायिक बैठक, मार्गदर्शन सत्रे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि नेटवर्किंग इव्हेंट्स आयोजित केले जातात.

सहभागी व्हा   📞 Call +91 77100 28395
आमचे ध्येय (Mission)

एकत्रित प्रगतीचा मार्ग

🚀

उद्योजकतेकडे प्रवृत्त करणे

🧭

व्यवसाय सुरू व विस्तारासाठी मार्गदर्शन देणे

💼

रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे

🌱

एकमेकांना सहकार्याची संस्कृती निर्माण करणे

आम्हालाच का निवडावे?

केवळ संघटना नाही, तर विकासाची चळवळ

सातारकरांसाठी खास व्यासपीठ म्हणून आमचा समुदाय विश्वास, सहकार्य आणि एकत्रित प्रगतीच्या मूल्यांवर उभा आहे. प्रत्यक्ष भेटी, मेळावे आणि संवादाच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असलेले संपर्क सहज उपलब्ध होतात.


या समुदायात अनुभव व ज्ञानाची मुक्त देवाणघेवाण होते, ज्याचा लाभ नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांपासून अनुभवी उद्योजकांपर्यंत सर्वांनाच मिळतो.

🎁 खास ऑफर्स

सातारकर ऑफर्स आणि सूट

सातारकर व्यावसायिकांकडून ताज्या ऑफर्स — नोंदणीशिवाय तुमचीही ऑफर प्रकाशित करा.
50% Discount 50% सूट ⏳ 48 दिवस शिल्लक इतर

50% Discount

🏪 Final Touch Websoltuions
📍 Kapshi, Phaltan
₹5,000 ₹2,498
सर्व ऑफर्स पहा + ऑफर प्रकाशित करा
आगामी उपक्रम

कार्यक्रम, मेळावे आणि संधी

🎪

सातारकर उद्योजक मेळावा

सातारकर उद्योजक आणि व्यावसायिकांना एकत्र आणणारा भव्य मेळावा, जिथे व्यवसायिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतात.

🌐

नेटवर्किंग मीट-अप्स

उद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांमध्ये प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी व मजबूत व्यावसायिक नेटवर्क तयार करण्यासाठी विशेष भेटी.

🎓

व्यवसाय मार्गदर्शन सत्रे

व्यवसाय सुरू करणे, वाढवणे आणि टिकवणे यासाठी तज्ज्ञांकडून उपयुक्त मार्गदर्शन.

अनुभवी उद्योजकांशी संवाद

अनुभवी उद्योजकांचे प्रेरणादायी अनुभव, यशोगाथा आणि शिकवण थेट ऐकण्याची संधी.

🏪 आपल्या व्यवसायाची माहिती भरून सहभागी व्हा

सातारा व्यवसाय नोंदणी

197एकूण नोंदी
११तालुके
जिल्हा सातारा

नवीन व्यवसाय नोंदवा

FAQs

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आम्ही सातारकर उद्योजक संघ म्हणजे काय?

सातारकर समाजासाठी स्थापन केलेली सामाजिक व व्यावसायिक संघटना आहे, जी व्यवसाय, रोजगार आणि नेटवर्किंगसाठी एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देते.

या संघटनेत कोण सहभागी होऊ शकतो?

मुंबई किंवा इतर ठिकाणी राहणारे सातारकर उद्योजक, व्यावसायिक, नवउद्योजक, नोकरी शोधणारे तसेच व्यवसाय सुरू करू इच्छिणारे सर्वजण सहभागी होऊ शकतात.

सदस्य होण्यासाठी कोणती अट आहे का?

सातारकर असणे आणि संघटनेच्या उद्दिष्टांशी सहमत असणे एवढीच मुख्य अट आहे.

सदस्य झाल्यावर मला काय लाभ मिळतील?

व्यवसाय नेटवर्किंग, मार्गदर्शन सत्रे, उद्योजक मेळावे, रोजगार संधींची माहिती आणि अनुभवी उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी मिळते.

संघटनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी कशी करावी?

वेबसाईटवरील नोंदणी फॉर्म भरून किंवा दिलेल्या संपर्क माध्यमांद्वारे तुम्ही सहज सहभागी होऊ शकता.

जय शिवराय